नाशिक प्रतिनिधी:,
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वाडी परिसरात दोघं भावांची धारदार शास्त्रांनी निर्गुण हत्या करण्यात आली..
या दोघा भावांची हत्या झाल्याने उपनगर परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे....
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेडकर वाडी परिसरात मन्ना जाधव व प्रशांत जाधव नामक दोघा भावांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राचा वापर करून न निर्घुण हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
हत्या करणारे हल्लेखोर अज्ञात असून त्यांचा शोध उपनगर पोलीस घेत असून हत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनेची माहिती कळताच परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कड, युनिट दोन चे हेमंत तोडकर, यांच्यासह नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तसेच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करून दोघा-मृतांना उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे घटनेनंतर नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाल्याचे देखील बोलले जात आहे....
कोणत्या कारणामुळे खून झाला याचा तपास पोलीस करत आहेत
