नाशिक :,
नितीन चव्हाण
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कल्पना चुंभळे यांच्या नावाची चर्चा होऊ लागली होती अज्ञातस्थळी गेलेले संचालक नाशकात परतले परतले.. कल्पना चुंभळे सभापती झाल्यास बाजार समितीला ७३ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला सभापती मिळाले
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देविदास पिंगळे यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या पिंगळे गटाच्या नऊ संचालकांनी त्यांची साथ सोडत शिवाजी चुंभळे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे १५ संचालकांनी एकत्र येत पिंगळे यांच्या विरूद्ध अविश्वास ठराव मांडून तो मंजुर करण्यात आला होता. नवीन सभापती निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.१९) संचालकांची बैठक बोलविली होती. तत्पुर्वी चुंभळे गटाचे संचालक अज्ञातस्थळी रवाना झाले होते. सभापती पदाच्या निवडीसाठी अज्ञातस्थळी गेलेले सर्व संचालक हे संचालक नाशकात
दाखल झाले असून, सभापती पदाची निवडणूक प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य मार्केट कमिटीच्या कार्यालयामध्ये होणार झाली त्या नंतर
सभापतीपदासाठी शिवाजी चुंभळे यांच्या नावाची चर्चा होत असली तरी, पत्नी कल्पना चुंभळे यांच्या नावाला सर्व संचालकांनी सहमती दर्शविल्याने त्यांचीच निवड होणार असल्याची चर्चा होत होती, बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतीपदाचा मान महिलेला आहे... त्यामुळे सर्व स्तरातून चुंबळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
