सिडको प्रतिनिधी:,
सिडको स्टेट बँक चौक
अग्निशामन दलाच्या नूतन इमारतीचे कलश पूजन व लोकार्पण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले...
२५ वर्ष जुने असलेले अग्निशमन केंद्राचे काम गेल्या आठ महिन्यापासून सुरू होते
या केंद्राला 2 कोटी १० लाख रुपये खर्च करून नवीन इमारत उभारण्यात आली
या अग्निशमन केंद्रामध्ये 16 ट्रेनी कर्मचारी आहेत तर दहा कर्मचारी कायमस्वरूपी असल्याची माहिती अग्निशमन दलाची केंद्रप्रमुख प्रमोद लहामगे यांनी दिली...
या इमारतीचे लोकार्पण पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात संपन्न झाले अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी यांच्या हस्ते फीत कापून कलश पूजन करण्यात आले... या नूतन इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी सिडको अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रमोद लहामगे तसेच नाशिक मधील सर्व केंद्राचे प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते...
