इंदिरानगर प्रतिनिधी
:,
पाथर्डी फाटा येथे दोन संशयितानी बाकेराव डेमसे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. गाडीचा हॉर्न वाजवल्या मुळे वाद होऊन हा हल्ला झाल्याचे समजते.
त्यावेळी दोघा संशयीतांनी गाडीवर दगड टाकत काचा फोडल्या. तसेच हातात कोयता घेऊन बाकेराव डेमसे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बाकेराव डेमसे हे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मदन डेमसे यांचे वडील आहे.
या हल्ल्यानंतर संशयीतन विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू होते.
