नाशिक प्रतिनिधी:,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिक ओझर विमानतळावर आगमन झाले आहे...
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत.. तसेच विविध ठिकाणी पाहणी देखील करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
नाशिक मध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो..
नाशिकचे पालकमंत्री अद्यापही ठरलेले नाहीत त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पाहणी दौरे व बैठकी पार पडणार आहेत... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन होताच... राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.
यावेळी माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ. राहुल आहेर, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते.
