नाशिक प्रतिनिधी:,
काल सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्थानकावर सुलभ शौचालयाचा स्वच्छता कर्मचारी विजय इलमचंद गहलोत याला शुभम जगताप याने हैप्पी होली म्हणत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय गहलोत हे सीबीएस येथील ठक्कर बाजार या ठिकाणी असलेल्या बस स्टॅन्ड वर सफाई कर्मचारी आहेत शुभम जगताप व गेहलोत यांच्यात किरकोळ वाद झाला होता...
यामध्ये गेलोत याने विजय जगताप याला तू इथून निघून जा तुझ्यामुळे आमची बदनामी होते असे म्हटले त्यानंतर जगताप याने एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पेट्रोल आणून गेहलोत यांचा अंगावर फेकले व हॅप्पी होळी असे म्हणत जवळ असलेल्या सिगारेटच्या लाईटरने पेटवून दिले.
यामध्ये विजय गेलोत हा ६० टक्के भाजला असून त्याला उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले...
पोलिसांना माहिती समजतात घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली... फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
... गुन्हे शाखा युनिट १ मधील अधिकारी व अंमलदार यांनी पाहिजे असलेल्या आरोपीची माहिती काढत त्याला जेर बंद केले.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप म्हसदे, संदीप भांड, प्रशांत मरकड,नाजीम खान पठाण, विशाल काठे,विशाल देवरे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे,समाधान पवार यांनी केली आहे.... काही दिवसांपासून विजय गेहलोत हा जाणून-बुजून चेष्टा मस्करी करून काही एक कारण नसताना मारहाण करीत होता.व मला त्या ठिकाणी राहण्यास मज्जाव करून हाकलून देत होता त्या त्रासाला कंटाळून मी गुन्हा केल्याची कबुली शुभम जगताप यांनी दिली आहे.. पुढील कारवाईसाठी शुभम जगताप याला सरकार वाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे
