सिडको:,
अंबड परिसरात हिटरचा करंट लागल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रिंकु उपेंद्र यादव (वय ३५, रा. दत्तनगर, शिव महिमा रो. हाऊस, चुंचाळे, अंबड) असे मृत महिलेचे नाव आहे.
दि. १५ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता घरी पाणी गरम करण्यासाठी हिटर लावला असता त्यांना करंट बसला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. तातडीने त्यांना सिव्हील हॉस्पिटल, नाशिक येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद सरकारवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
