नाशिक प्रतिनिधी:-
16 फेब्रुवारी रात्रीच्या वेळी ला सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीत मोहदरी वन उद्यानाच्या समोर असलेल्या टाटा कंपनीच्या अधिकृत पेट्रोल पंपावर अज्ञातांनी केबिनमध्ये प्रवेश करून लाकडी दांडे तलवारीचा धाक दाखवून ३०, ४७० रुपये बळजबरी लुटल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
तसेच २६ फेब्रुवारीला.... घोटी पोलीस स्टेशन हद्दीत खंबाळे शिवारात श्रीहरी पेट्रोल पंपावर १८००० रुपये किमतीचा मुद्देमाल गेल्याची तक्रार घोटी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती
या घटनेचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही कॅमेरा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या आधारे तपास सुरू केला मांड सांगवी येथील अमोल माळी शरद,बाळू खांदवे,महेश ससाने,व शंकर इंगळे, तसेच एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली
सिन्नर, ब्राह्मणवाडे, खंबाळे, लाखलगाव या ठिकाणच्या पेट्रोल पंपावर लूट केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून एक चार चाकी वाहन एक मोटर सायकल तलवार असा पाच लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस निरीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक राजेश सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, विनोद टिळे,प्रशांत पाटील, हेमंत किलबिले, प्रदीप बहिरम,प्रवीण गांगुर्डे या पथकाने एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहे.
