Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्रचारासाठी आणलेल्या 65 महिलांचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये सिडको परिसरात तुंबळ हाणामारी

 प्रचारासाठी आणलेल्या ६५ महिलांचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये सिडको परिसरात  तुंबळ हाणामारी

सिडको प्रतिनिधी:-



अवघ्या आठ दिवसांवर महापालिका निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर राजकीय प्रचारासाठी विविध महिलांना रोजगार मिळत आहे. प्रचार यंत्रणेला महिला मिळवण्यासाठी उमेदवारांकडून विविध एजंट्सला नेमण्यात आले आहे. या एजंट एजंट करून दररोज महिलांची जमवाजमव केली जाते. मंगळवारी सकाळी सिडकोतील पंडित नगर येथे एक नाही दोन नाही तर जवळपास ६४ हून अधिक महिला शहरातील एका राजकीय उमेदवाराच्या प्रचाराला जाण्यासाठी जमल्या होत्या. महिलांना चारशे रुपये प्रचाराचा रोजगार द्यायचा असे एजंट महिलेकडून ठरविण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता महिला आल्या त्यांना घेण्यासाठी शहरातून वाहतुकीची व्यवस्था करणाऱ्या बस येणार असल्याचे सांगण्यात आले अकरा वाजल्यानंतरही वाहन व्यवस्था आली नाही. आत्ता बस येईल तेव्हा येईल असे करत तब्बल दोन वाजेचा टाईम उलटला. मात्र प्रचारासाठी जाणाऱ्या महिला आहेत त्याच ठिकाणी थांबल्याने अखेर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास महिलांना आता तुम्ही घरी जा प्रचार कॅन्सल झाला आहे असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे प्रचारासाठी आलेल्या या महिलांना नाश्त्याची तशीच कोणतीही जेवणाची व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी चक्क अंबड पोलीस स्टेशन परिसरात एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. आम्हाला तू प्रचारासाठी आणले आहे आमचे पैसे तू आत्ताच्या आत्ता दे असे सांगितल्यानंतर एजंट महिलेने समोरील उमेदवाराच्या कार्यकर्त्याला फोन लावला मात्र या कार्यकर्त्याने फोन बंद करून ठेवल्याने महिलांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी झाली यावेळी दोन महिलांनी एकमेकांचे केस ओढून थेट हाणामारीच केली. अनेक नागरिक या महिलांची हाणामारी बघत होते. यामुळे एकच चर्चा सर्वत्र सिडको परसरात रंगली होती अनेक नागरिकांनी महिलांचे हाणामारी सुरू असतानाचे व्हिडिओ देखील काढले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.