घर मालक व मा. नगरसेविकेच्या पतीसह अन्य साथीदारांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सिडको/नितिन चव्हाण
प्रभाग क्र 31 मधील सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेविकेचे पती यांच्या सह अन्य सहकार्यांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. सविस्तर माहिती अशी की..
इंदिरानगर परिसरातील घरफोडी प्रकरणात सहा आरोपींसह काही अज्ञात व्यक्तींवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील कडी-कोंडा तोडून आत प्रवेश करून लाखोंचा ऐवज चोरल्याची तक्रार महिलेने नोंदविली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी रेणुका श्रीराम महाले उर्फ रेणुका गायकवाड (वय ३६ रहा चेतना नगर, इंदिरानगर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देवी मंगलसिंग अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ९ मध्ये आरोपींनी संगणमत करून मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडला आणि आत प्रवेश केला.
घरातून सुमारे ४ लाख रुपयांचा माल लंपास करण्यात आला. त्यामध्ये दोन तोळ्याचे २लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख ५० हजार रुपये, २५हजार रूपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, २५ हजार रुपये किमतीचा रुपयांचा लिनोवा लॅपटॉप, तसेच सुमारे१ लाख किंमतीचे कंप्युटर सेट, साऊंड सिस्टम, प्रिंटर, स्पीकर आदी साहित्याचा समावेश आहे. याशिवाय घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅसशी संबंधित साहित्य, कपडे, शैक्षणिक कागदपत्रे व शिक्षण साहित्य यांचेही मोठे नुकसान करण्यात आले.
या प्रकरणी युरालिक मिद्दानी जेम्स, सिलवासा युरालिक जेम्स (दोन्ही रा. नायगाव, मुंबई), पल्लवी देशमुख, पियूष देशमुख, नरेंद्र भदाणे, साहेबराव आव्हाड (सर्व रा. इंदिरानगर, नाशिक) तसेच दोन ते तीन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
