महिलेची टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या
सिडको प्रतिनिधी:,
अंबड परिसरातील घरकुल योजना, चुंचाळे येथील रहिवासी रुक्मीनी विठ्ठल हिवाळे (वय ४८ वर्षे) यांनी दि. १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली.
उडी घेतल्यानंतर त्यांच्या डोक्याला, छातीला तसेच दोन्ही हात व पायांना गंभीर दुखापती झाल्या. नातू सुनिल सुरेश वाघमारे यांनी तातडीने त्यांना प्रथम ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायंकाळी ५:३० वाजता सिव्हील हॉस्पिटल, नाशिक येथे हलवण्यात आलं.
तेथे दाखल केल्यानंतर डॉ. शिंगे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिव्हील पोलीस चौकीतील पोहवा चव्हाण, पोहवा जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रुक्मीनी हिवाळे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
