३९ वर्षीय इसमाला अज्ञात मारेकर्यांनी धारदार शस्त्राने वार करत संपवले
सिडको प्रातिनिधी:,
नाशिक शहरातून हत्येची आणखी एक बातमी समोर आली आहे. त्यानिमित्याने नाशिक शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. यात ३९ वर्षीय युवकाची काही अज्ञातांनी
धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडलीय. कार्बन नाका परिसरातील आनंद छाया हाईट्स या परिसरात ही घटना घडल्याचे समजते प्रकाश मधुकर सुर्यवंशी, वय ३९ असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मात्र हा खून नेमका कोणी आणि कुठल्या कारणावरून केला हे अद्याप कळू शकलेले नाही.
सुर्यवंशी यांच्या पत्नी सुवर्णा प्रकाश सुर्यवंशी यांनी ११ एप्रिल रोजी जिल्हाशासकीय रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान सुर्यवंशी यांचा मृत्यु झाला मात्र या हत्येच्या घटनेने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलवडे, यांनी तात्काळ घटस्नास्थळी जाऊन पहाणी केली आरोपी अटक करण्यासाठी पथक रवाना केले आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते
