Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

अनं वडीलांना शेवटचा फोन ठरला....

सिडको प्रतिनिधी:-

 दोन दिवसापूर्वी सिडकोतील उत्तम नगर परिसरात केली मित्रांनीच मित्राची  हत्या केल्याचा खळबळ जनक प्रकार घडला होता एन होळी सणाच्या दिवशीच सिडको परिसरात रक्तरंजित थरार बघायला मिळाला संपूर्ण परिसरात या घटनेमुळे घबराटीचे 


वातावरणही पसरले होते 

 परिसरात सर्वत्र होळीचे पूजन सुरू होते... प्रत्येकाच्या घरात सणाचा आनंद घेतला जात असताना एक महाविद्यालयीन युवक मात्र स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी धडपड होता... त्याच्या अंगावर धारदार शस्त्रांचे वार होत असताना बघे फक्त उभे होते... त्याच्यावर होत असलेला हल्ला चांचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही... 'पप्पाऽऽ... लवकर या मला मारलंय...' जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या युवकाचे हे शेवटचे वाक्य तरले। सुमित देवरे या महाविद्यालयीन युवकाची वर्दळीच्या ठिकाणी झालेली हत्या म्हणजे


केवळ एका युवकाची नव्हे, तर माणुसकीचीही हत्या ठरली!


सुमित देवरे हा सटाण्यातील महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत असलेला हुशार विद्यार्थी, होळीच्या दिवशी (दि. १३) संध्याकाळी त्याला 'शुभम पार्कला ये तेथे आपल्याला भेटायच आहे' असा फोन आला. सुमितही ताडकन निघाला. त्याच्या आईने त्यास जाण्यास विरोध केला. मात्र क्रूर काळाचा खेळ सुमितच्या मनाला कळला नाही. आईचे न ऐकता तो घराबाहेर पडला. शुभम पार्कनजीक असलेल्या चर्चजवळ सुमित पोहोचला. काय होत आहे हे कळण्याच्या आत चार संशयितांनी


सुमितवर चॉपरने सपासप वार करण्यास सुरुवात केली. काही क्षणांत सुमित रक्ताच्या थारोळयात पडला, वर्दळीचा रस्ता... सायंकाळची वेळ आणि होळीचा सण असल्याने रस्त्यावर गर्दी होती. हे क्रूर नाट्य घडत असताना आजूबाजूला बघ्याची गदीं झाली; मात्र एकही जण हल्ला वाचविण्यासाठी पुढे आला नाही.


हल्ला करणारे चौघे, त्यात दोन आल्पवयीन, अंगावर वार झेलणारा एकटा आणि बघणारे अनेक! यातील आठ-दहा युवक जरी पुढे आले असते, तर कदाचित सुमितचे प्राण वाचले असते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.