सिडको प्रतिनिधी:-
परिसरातील रायगड चौक भागात दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच या गढुळ पाण्यात आळ्या आढळून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मनपा पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सिडको परिसरातील रायगड चौक भागात गेल्या काही दिवसापासून दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.
महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी यांना याबाबत नागरिकांनी सांगून देखील समस्या सोडविण्यात येत नाही. मनपा प्रशासन डोळे झाक पणा करीत असल्याने महिला वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
दुर्गंधीयुक्त पाण्यात अक्षरशः अळ्या निघत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सकाळी पिण्याच्या पाण्यासोबत दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना पाणी पिणे देखील मुश्किल झाले आहे.
या दुषित पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, हे दुषित पाणी पिल्याने अनेक लोक आजारी देखील पडले आहेत. या दुषित पाण्यामुळे नागरिकांचा जीव देखील जाऊ शकतो. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून असे दुर्गंधयुक्त पाणी येत आहे. या संदर्भात बऱ्याच वेळा तक्रारी दिल्यात परंतु अधिकारी फक्त उडवाउडीचे उत्तर देत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महिलांना तीन ते चार वेळेस पाणी गाळून घ्यावे लागते. तरी देखील पाणी पिवळसर आणि दुर्गंधयुक्त येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरले तर याला जबाबदार कोण....?
असा सवाल रहिवाश्यांनी उपस्थित केला आहे. यावर मनपा प्रशासनाने ठोस कारवाई करून स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी छावा क्रांतिवीर सेने चे तसेच शिवसेना उबाठा गटाचे योगेश गांगुर्डे यांच्या तर्फे करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी तसेच नागरिकांनी दिला आहे.
यावेळी परिसरातील आरती हिरे,सपना चौधरी,सुवर्णा सोनवणे,वैशाली काकळीज
छाया पुरे,दिपाली केजरे,संगीता शिंदे यांनी पाणीपुरवठ्याच्या या कामाबद्दल संताप व्यक्त केला...
नविन नाशिक मधील ठिकठिकाणी गढूळ तसेच अळ्या युक्त पाणीपुरवठ्याच्या समस्येने अधिक उग्र रूप धारण केले आहे.
प्रतिक्रिया---------------------
जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणासाठी क्लोरिनेशन वाढवणे गरजेचे असताना प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याने नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पहिले या भागात पाणी ची टंचाई होती तर आता गढूळ, आळ्या मिश्रित पाणी यावर तोडगा जर निघाला नाही तर येत्या दोन ते तीन दिवसात महानगर पालिका समोर हेच पाणी घेऊन आंदोलन करू..
योगेश गांगुर्डे, विभाग संघटक, ठाकरे गट
