सिडको प्रतिनिधी:,
नाशिक शहरात दोन भावंडांचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच....
सातपूर भागात गाव गुंडांचा हौदोष बघायला मिळाला
बिलाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल चालवणाऱ्या दोन भावांना सहा ते सात जणांच्या टोळक्यांनी बेदम मारहाण केली
आहे....
या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे....
नाशिकच्या सातपूर भागात असलेल्या अज्जू का ढाबा या ठिकाणी ही घटना घडलेली आहे..
आरोपींविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... यामध्ये हॉटेलमधील काही वस्तूंची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे... हॉटेल चालकाकडे बिलाचे पैसे मागितल्याने ही घटना घडल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे...
