Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कसारा घाटात ट्रक दरीत कोसळून दोन जण जागीच ठार

घोटी प्रतिनिधी:-


 मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत पडल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या बाबत अधिक माहिती अशी की, नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंटजवळ सिमेंटने भरलेला ट्रक मुंबईकडे होता. याच वेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून हा ट्रक थेट दरीत कोसळला. शुक्रवार दि. २१ रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.



ह्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. अपघातामुळे दरीत सिमेंट पसरले असून ट्रकचा चक्काचूर झाला आहे. महामार्ग पोलीस केंद्र घोटी व रूट पेट्रोलिंग टीम व कसारा शहापुर येथील आपत्ती टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरु करून त्यांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर कडून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात MH18 BG 9004 ह्या ट्रकचा चालक सौद अहमद अन्सारी वय २८ रा. मालेगाव व त्याचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब हे जागीच ठार झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.