नाशिक प्रतिनिधी:-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक लढविलेले दिनकर पाटील यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.
भाजपकडून तिकीट मिळाले नसल्याने दिनकर पाटील यांनी मनसेत प्रवेश करत विधानसभा लढवली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी कामाचा आढावा घेण्यात
पक्षसंघटन मजबुतीसाठी पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दिनकर पाटील जिल्ह्यातील अनुभवी राजकीय नेते आहेत. नाशिकमध्ये मनसेनेच्या वाढीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदी उपस्थित होते.
