Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

घरफोडी करणारे चोरटे अवघ्या चार तासात मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात....

 नाशिक प्रतिनिधी :,


मध्यरात्री घरफोडी करणा-या दोन ईसमांना मुंबईनाका पोलीसांनी ठोकल्या बेड्या दोन्ही आरोपीतांकडुन दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश


नाशिक शहर व परीसरात दिवसेंदिवस चो-या व घरफोड्या तसेच ईतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले आहेत. सदर प्रकारांना आळा घालणेबाबत व आरोपीतांवर कडक कारवाया करण्याचे नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो. यांनी वेळोवेळी आदेश दिलेले आहेत.


मुंबईनाका पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे विनयनगर, परीसरात दि. 06 मार्च 2025 चे मध्यरात्री घरफोडीचा प्रकार झाल्याने त्यानुसार दिनांक 06 मार्च 2025 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 73/2025 BNS कलम 331(3), 331(4), 305 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच आरोपींना शोधुन काढणेकामी वरीष्ठांनी तात्काळ गुन्हेशोध पथकास आदेश दिले. मुंबईनाका पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष नरुटे यांनी लागलीच सुत्रे फिरवीली व तात्काळ ए पीआय सतीष शिरसाठ व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. सदर ठिकाणचे CCTV चेक केले असता दोन ईसमांनी सदर घरफोडी केल्याचे दिसुन आले.


सदर दोन्ही आरोपीतांचा शोध घेत असताना मुंबईनाका पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2445 गणेश बोरणारे यांना नमुद आरोपीता बद्दल गोपनिय माहीती मिळाली की संशयित आरोपी हे भारतनगर परिसरातील असुन त्यांची नावे 1) तौफीक हसन शहा व 2) दिनेश राजु डगळे दोन्ही राहणार भारतनगर नाशिक असे आहे. त्या अनुषंगाने भारतनगर परिसरात सापळा रचुन सदर दोन्ही आरोपीतांना चार तासांच्या आत ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर घरफोडी केल्याचे कबुल केले व सदर घरफोडीतील चोरीस गेलेले 40 हजार रूपये किंमतीचे जॅग्वार कंपनीचे नविन नक़ दोन्ही आरोपीताकडुन हस्तगत करण्यात आले आहे. तसेच नमुद दोन्ही आरोपीतांकडे सखोल तपास केला असता त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर 74/2025 या गुन्ह्यातील चोरीस गेलेले इनफिनिक्स कंपनीचा 01 तसेच लाव्हा कंपनीचा 01 मोबाईल तसेच 03 ड्रील व कटर मशिन असा 21500 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरल्याचे कबुल केले.


असा एकुण 02 गुन्ह्यातील 61500 रूपये किंमतीचा मुद्देमाल वर नमुद दोन्ही आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात मुंबई नाका पोलीसांना यश आले आहे. नमुद दोन्ही आरोपीतांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस हवालदार 637 गाढवे हे करत आहेत.


सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 01, श्री किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष नरूटे यांचे देखरेखीखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुधीर पाटील, गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सतिष शिरसाठ यांचे सुचनेप्रमाणे ASI रोहीदास सोनार, पोलीस हवालदार 637 देविदास गाढवे, पोलीस अंमलदार 2445 गणेश बोरणारे, पोलीस अंमलदार 2062 दिपक जगदाळे, 2284 आकाश सोनवणे, 2358 समीर शेख, 2439 नवनाथ उगले, 2349 राजेन्द्र नाकोडे, 2305 योगेश अपसुंदे अशांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.