नाशिक प्रतिनिधी :,
इंदिरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री दहा वाजे च्या सुमारास एका ७० वर्षीय आज्जीच्या गळ्यातील चार लाख रुपये किमतीची सोण्याची पोत चोरट्यानी लांबवल्याचा प्रकार पांडवनगरी परिसरात घडला आहे...
सविस्तर माहिती अशी की मालती भालचंद्र वाणी या 70 वर्षीय आज्जी दाताच्या दवाखान्यातून घरी परत येत होत्या परत येत असताना त्यांच्या मागून आले
व त्यांनी मालती वाणी यांच्या अंगावर गाडी घालत त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओरबडून पोवारा केला या घटनेत मालती वाणी यांच्या गळ्याला दुखापत झाली असून
त्यांनी त्यांच्यासोबत झालेला प्रकार हा त्यांच्या मुलीला सांगितला त्यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे....
