आरोग्याबाबत सजग राहणे गरजेचे : डॉ.अनिता
प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात अनेक अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. कर्करोगासह इतर व्याधींवर प्रभावी उपचार सुविधा उपलब्ध आहेत म्हणूनच महिलांनी आरोग्याबाबत सजग राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्पर्श वुमन हॉस्पिटलच्या संचालिका व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अनिता बांगर यांनी केले.
कुलस्वामिनी महिला मंडळ पवननगर यांच्या तर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.बांगर बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर डॉ.अनिता बांगर, अध्यक्षा छाया ब्राह्मणकर, सुरेखा अमृतकर, वंदना नानकर, निर्मला शिरोडे, अंजनी ततार, मीरा बधान, लता अमृतकर, आशा येवले, अनिता कोठावदे यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
डॉ.अनिता बांगर म्हणाल्या, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी महिला घेत असतात. त्यामुळे कुटुंबात महिलांच्या आरोग्याला प्राधान्यक्रम दिला गेला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार उपलब्ध केले असून, एखाद्या आजाराचे निदान झाल्यास घाबरुन न जाता योग्य सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर बौद्धीक खेळ आणि आरोग्याचा मेळ हा अनोखा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जितेंद्र येवले, भारती मालपुरे, रजनी सोनजे, पुष्पा शिनकर, विजया येवले, सुवर्णा अमृतकर
