सिडको प्रतिनिधी:,
पाथर्डी फाटा येथील हॉटेल ताज च्या संरक्षण भिंतीपासून सिड
को हॉस्पिटल चौकापर्यंत गेल्या काही वर्षांपासून चायनीज अंडा भुर्जी च्या गाड्या तसेच एका बाजूला पाटावरवंटा विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या झोपडी धारकांनी अतिक्रमण केले आहे.
गुरुवारी दुपारी या ठिकाणच्या झोपड्या जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आल्या. यामुळे आठ ते दहा झोपड्यांमध्ये उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबीयांना आता बेघर व्हावे लागले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जागेत असलेल्या स्टेट बँक चौपाटीवरील पथविक्रेतांना तसेच हॉकर्स ला या ठिकाणी स्थलांतर करावयाचे असून यासाठी अतिक्रमण कारवाई करीत असल्याची माहिती विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी दिली आहे.
या अतिक्रमण कारवाईत राजेंद्र उगले, अतिक्रमण विभाग प्रमुख निखिल तेजाळे, प्रकाश नाठे,रवींद्र काथवटे, वाहन चालक सुनील हिरे ,अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
